Geet Ramraksha

ramAsset2_f0ac0b6d-b11a-45b1-b1ec-d930102a862f_1024x1024-removebg-preview

गीत रामरक्षा

(Background) पूर्वपीठिका

रामरक्षेचे संस्कार प्रत्येक घरातून लहान मुलांवर होत असतात. तसेच माझेही झाले. रामरक्षा म्हणायचा नित्यक्रम असायचा. याशिवाय माझे वडील—श्री पांडुरंग हणमंत कुलकर्णी—यांनी मला शालेय वयात रामरक्षा सखोल अर्थासहित शिकवली.त्यातील संधी–समास सोडविणे हा आमचा आवडीचा खेळ असायचा.

(Inspiration) प्रेरणा

2025 मध्ये माझे कुटुंबीय अयोध्येला जाऊन आले पण माझे जाणे राहिले, तेव्हा वाटले—रामरक्षा गाण्यातूनच रामाला वंदन करू. आणि त्यातून गीत रामरक्षा जन्माला आली. श्रीबुधकौशिकऋषिविरचित रामरक्षेचे मराठी मध्ये ओवीवृत्तात गीतानुवाद लेखन त्या वेळी मजकडून पूर्ण झाले.  आणि नंतर दीप्ती आर्ट्स च्या मदतीने रामलल्लाचे पेन्सिल स्केच देखील मजकडून झाले. ही  सारी रामकृपाच.

(Recording) ध्वनीमुद्रणाबाबत

हे संपूर्ण स्तोत्र मी घरच्या साधेपणात, रोजच्या रियाजप्रमाणे, मोबाईलवरच रेकॉर्ड केले आहे. कोणताही व्यावसायिक सेटअप नाही—लहान तुकडे रेकॉर्ड करून जोडले आहेत. त्या वेळी आजूबाजूचे इतर आवाज जे काही टाळता आले तेवढे टाळले. पण माझे मनातले भाव— कंठ दाटणे, कृतज्ञता—तसेच जपले आहेत. याच मूळ आवृत्तीला माझ्या सद्गुरूंचा स्वामी मकरंदनाथ यांचा  आशीर्वाद लाभला, म्हणून तीच  येथे शेअर करत आहे. ही प्रस्तुती सर्वांना शांती, तुष्टी, भक्ती आणि संरक्षण देवो, हीच श्रीरामचरणी प्रार्थना.

(GEET RAMRAKSHA) गीत रामरक्षा

https://youtu.be/NQQ4Qypn-3g?feature=shared