Offerings
Offerings
Ashtavinayak BandishMala
अष्टविनायकबंदिशमाला
Ashtavinayak BandishMala
अष्टविनायक
बंदिशमाला
अगदी अजाणत्या वयापासून आद्यशंकराचार्यांची स्तोत्रे,गीतेचे अध्याय आणि अनेक अभंग,गवळणी,भारुडे इत्यादी माझ्या कानावर पडत आली.आम्हा सगळ्या भावंडांवर आईवडिलांकडून अतिशय सहजतेने या गोष्टींचे संस्कार होत गेले. माझे वडील श्री.पांडुरंग हणमंत कुलकर्णी यांचे इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. संस्कृत बरोबरच तत्वज्ञान,अद्वैतवेदान्त,उपनिषदे याचा देखील त्यांनी सखोल अभ्यास केला होता. आईभाऊ दोघे मिळून एकत्र गीता, ज्ञानेश्वरी, सकल संत गाथा,अभंग यांचा अभ्यास करत. आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर त्यांनी हा अभ्यास फक्त स्वानंद मिळवण्यासाठी केला. मी गणित शिकवत असले तरी तू संस्कृतचा संबंध सोडू नकोस असे ते मला नेहमी बजावत. पण पुढे वडिलांनी मोरोपंतांच्या केकावलीचे संस्कृतमध्ये केलेले भाषांतर मी सहज चाळले. मग सहज मनात विचार आला की, त्यांनी कधीच कुठली गोष्ट त्यांच्या मुलांवर लादली नाही. मग आपल्याला येत असलेल्या गोष्टीतून आपण संस्कृतशी मैत्र अजून वाढवू. अशा विचारातून मग अष्टविनायकांवर आणि आणखीही एका संहितेवर संस्कृत बंदिशी बांधण्याचा विचार मनात आला. सध्या अष्टविनायक बंदिशमाला रसिकांसमोर पेश केली आहे.
‘अष्टविनायकबंदिशमाला’–
‘माला’या संस्कृत शब्दाचा अर्थ देवाच्या जपाची माळ किंवा फुलांची माळ. ‘अष्टविनायकबंदिशमाला’ म्हणजे आठही बंदिशीं मधून आठही विनायकांचे केलेले पूजन. या आठ बंदिशी या माळेतले मणी किंवा फुले आहेत असा विचार. यामध्ये अष्टविनायकांमधील प्रत्येक गणपतीवर एक बंदिश आहे, आणि या सर्व बंदिशी राग संगीतात विविध वेळी (सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र) विविध प्रहरी गायले जाणाऱ्या विविध आठ रागांमध्ये निबद्ध आहेत.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सर्व बंदिशींचे काव्य देववाणी म्हणजे संस्कृत भाषेत लिहिलेले आहे. या सर्व बंदिशींमधून भक्तिरस, गणेशाप्रती शरण भावगायकांना आणि श्रोत्यांना देखील उत्तम अनुभवता येईल असे मला वाटते.
महाराष्ट्रात गणपतींची आठ प्रसिद्ध स्थाने आहेत. मोरगांव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही ती आठ ठिकाणे. येथील गणेश मंदिरे प्रसिद्ध आहेत, आणि तेथील गणपतींना अनुक्रमे मयूरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणि, विघ्नेश्वर, महागणपती अशी नावे आहेत. अष्टविनायकांमधील प्रत्येक गणेशाचे वेगळे महत्त्व आहे. संतमहंत, गणेशभक्त यांची तर ही तपोभूमी आहे. अष्टविनायकांबद्दल उपलब्ध माहितीचा अभ्यास करीत असताना असे लक्षात आले की, यातील बऱ्याच गणेशमूर्ती स्वयंभू आहेत. त्यांच्या माहात्म्याविषयी काही पौराणिक कथा, संदर्भ आहेत. तसेच बऱ्याच पेशवेकालीन इतिहासातले काही संदर्भ आहेत, ज्यामध्ये अष्टविनायकांमधील गणपतींचे, तथीलमंदिरे, मूर्ती या संदर्भातले काही उल्लेख आहेत. बंदिशींमधील काव्यामध्ये प्रत्येक गणेशाचे नाव, स्थानाचे नाव, पौराणिक संदर्भ, तसेच महत्वाचे वाटलेले ऐतिहासिक संदर्भ यांचा उल्लेख केलेला आढळेल.
बंदिशमालेचे ईप्सित
गीतेमध्ये भगवंत म्हणतात ,
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति |
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन: || 26||
(गीता९-२६).
(भगवंतांनी सांगितले आहे, जो कोणी फळ, फूल, पान, पाणी असे कांही सद्भावाने आणि शुद्ध मनाने मला अर्पण करतो त्याचा मी मोठया प्रेमाने स्वीकार करतो.)
या श्लोकाचे स्मरण ठेवून कुणी देवाला फळ, फूल असे जेकाही असेल ते मनोभावे अर्पण करावे, त्याप्रमाणे त्याच भावनेने ही बंदिशमाला श्रीगणेशाला अर्पण करीत आहे. काही चूक भूल असेल तर ईश्वरे क्षमा असावी. ही बंदिशमाला ईश्वराला प्रिय व्हावी ही इच्छा .