Vitthal Bhajan-Sanskrit

विठ्ठल भजन-संस्कृत
Vitthal Bhajan-Sanskrit

विठ्ठल भजन-संस्कृत
राग जोग वर आधारित एक संस्कृत भजन आपण ऐकू या . खरं तर ही रचना म्हणजे एक संस्कृत श्लोक आहे – आमच्या वडिलांनी म्हणजे भाऊंनी रचलेला . आमची आई भजनामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ‘ घेई घेई माझे वाचे’ हा सुंदर अभंग म्हणत असे. एक दिवस त्या अभंगावरून भाऊंनी उत्स्फूर्त असा हा श्लोक रचला.
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥
हा संत तुकाराम महाराजांचा अभंग.
इंद्रिय आणि मन यांना ताब्यात ठेवण्यास किती आटापिटा करावा लागतो. यावर उपाय म्हणजे इंद्रिय आणि मन यांनाच विठ्ठल परमात्म्याची ओढ लावायची म्हणून संत तुकाराम महाराज इथे त्यासाठी आळवणी करतात. त्यावर आधारित असलेल्या या प्रस्तुत श्लोकामध्ये देखील इंद्रिय आणि मनाला केलेली भक्तिमय आळवणी उत्कटपणे जाणवते. हा श्लोक म्हणजे हे राग जोग वर आधारित संस्कृत भजन-
पिब हे पिब हे जिह्वे | स्वादुनामामृतम् |
पश्य हे पश्य हे नेत्र | श्रीहरेर्मुखपङ्कजम् ||
शृणु हे शृणु हे कर्ण | श्रीपतेर्गुणकीर्तनम् |
धाव हे धाव हे चित्त | पत विठ्ठलपादयो:||